-->

Ads

मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून दोघेजण आत घुसले, CCTV दिसला अन्..

 छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चार लाखांची चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै : गेल्या काही दिवसांत शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य मार्केट असलेल्या कॅनोट भागात रात्री तीन वाजता दुकानाचे शटर उचकावून रेणुका टेलिकॉममध्ये चोरी झाली. 3 ते 4 लाख रूपयाचे मोबाईल, स्मार्ट वॉच, एअर बड् आणि रोख रक्कमसह चोरी करण्यात आली. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून, सदरील दुकान मालक आणि व्यापारी संघटनेनी पोलीस चौकीची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

कॅनॉट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल विक्रीचे शॉप आहेत. या मार्केट परिसरामध्ये मोठ-मोठे मोबाईल शॉप असून त्यातील एका शॉपमध्ये रात्री चोरट्याकडून चोरी केली आहे. यामध्ये शॉप मालकाच्या म्हणण्यानुसार तीन ते चार लाखाचा मुद्देमाल चोरी करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, सिडको पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतल्या जात आहे. मागील बऱ्याच दिवसापासून शहरांमध्ये मोटरसायकलचा रिसोन साखळी चोरी आणि आता शटर उचकटून दुकानातील चोरी समोर आल्यामुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढले आहे.

14 महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील बसस्थानक परिसरात जुन्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका किराणा दुकानात गेल्या 14 महिन्यांत 4 वेळा चोरी झाली असून चोरट्यांनी तीन वेळा या दुकानातून महागड्या सिगारेटची चोरी केली तर चौथ्या वेळी रविवारी मध्यरात्री काजू, बदाम आणि 50 हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

गल्लेबोरगाव येथे बसस्थानक परिसरात रामदास चंद्रटिके यांचे पवन किराणा दुकान आहे. या दुकानात चोरट्यांनी यापूर्वी 8 मे 2022 रोजी चोरी करून 70 हजार रुपयांच्या महागड्या सिगारेटची चोरी केली होती. ही चोरी या किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यात दुकानातील एक व्यक्ती पत्र्याच्या शेडवरील दुसऱ्या व्यक्तीला खालून सिगारेटचे पोते देताना दिसत आहे. दुकान मालक चंद्रटिके यांनी याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध असूनही चोरट्यांचा शोध घेतला नाही.


Post a Comment

0 Comments