-->

Ads

विभागप्रमुख संदीप भालके यांची महापालिकेकडे सुसज्ज जिजाऊ दवाखाना उभारणी करण्याची मागणी

 वाल्हेकरवाडीत प्राधिकरणाच्या जागेवर सुसज्ज जिजाऊ दवाखाना उभारणी करण्याची मागणी विभागप्रमुख संदीप भालके यांनी महापालिकेकडे केली.शिवसेनेच्या शिष्ट मंडळाचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन.


प्रतिनिधी रेखा भेगडे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाल्हेकरवाडी येथे दवाखाना आहे.दरम्यान दवाखान्याची इमारत नादुरुस्त झाल्याने हा दवाखाना परिसरातील खासगी इमारतीत स्थलांतरीत करण्यात आला आहे .ही जागा दवाखान्यासाठी अपुरी पडत असल्यामुळे वाल्हेकरवाडीतच प्राधिकरणाच्या जागेवर सुसज्ज अशा जिजाऊ दवाखान्याची उभारणी करण्यात करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख संदीप भालके यांनी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मन गोफणे यांच्याकडे केली आहे

याबाबत शिवसेनेच्या शिस्तामंडळासह नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना वाल्हेकरवाडी दवाखाण्याच्या समस्यांबाबत निवेदन दिले.यावेळी शहर् संघटक संतोष सौंदनकर, उपशहरप्रमुख संतोष पवार ,विभाग प्रमुख संदीप भालके ,नितीन दर्शिले ,शाखा प्रमुख अमित दर्शिले आदी उपस्थित होते .
संदीप भालके यांनी निवेदनात म्हटले आहे की,गेल्या चाळीस



वर्षांपासून वाल्हेकरवाडी परिसरात महापालिकेचा दवाखाना आहे .सध्यस्थितीत दवाखान्याची इमारत मोडकळीस  आली आहे‌ त्यामुळे महापालिकेने दवाखाना तात्पुरत्या परिसरातील खाजगी भाड्याच्या इमारतीत स्थलांतरित केला आहे. परंतु सध्याची ही भाड्याची जागा अपुरी व गैरसोईची ठरत आहे. तसेच मोठ्या स्वरूपात पालिकेला खासगी इमारतीचे भाडेही द्यावे लागत आहे. याशिवाय रुग्णांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.वाल्हेकरवाडी प्रभागाची लोकसंख्या 40ते 50 हजारांच्या आसपास आहे. बहुतांश नागरिक महापालिकेच्या या दवाखान्यात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे महानगरपालिकेने वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातील प्राधिकरणाची जागा अतिक्रमण होण्याआधी ताब्यात घ्यावी. त्या मोकळ्या भूखंडावर लवकरात लवकर सर्व सोईयुक्त अशा जिजाऊ दवाखान्याची उभारणी करावी त्यामुळे सर्व सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल.



Post a Comment

0 Comments