-->

Ads

मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना! हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने ४ जणांचा मृत्यू; १० जण भाजले

 दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी डीव्हीसी हॉस्पिटल बोकारो थर्मलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना समोर आली आहे. हाय टेन्शन लाईनच्या संपर्कात आल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण 13 जण गंभीररित्या भाजले आहेता. यामधील तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत दुर्देवी घटना घडली. जिल्ह्यातील पीतेरवार ब्लॉकमधील खेतको गावात आज मोहरम निमित्त मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान सर्वजण मोहरममध्ये ताजिया घेऊन जात असताना 11000 व्होल्ट वायरच्या संपर्कात आले. ज्यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण गंभीररित्या जळाले आहेत.

दुर्घटनेतील जखमींना प्राथमिक उपचारासाठी डीव्हीसी हॉस्पिटल बोकारो थर्मलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर व्यक्तींना बोकारो सामान्य रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी झाली आहे. यासोबतच डीव्हीसी हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी झाली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच पेटरवार पोलीस ठाणे आणि बोकारो थर्मल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments