-->

Ads

अरेच्चा! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळेना, अखेर तरुणीने स्कुटी थांबवली अन्...

खड्डेमय आणि चिखलमय रस्त्याने बीडकरांचे हाल...


बीड :आतापर्यंत आपण खड्डा चुकवताना एखादा अपघात झालेला पाहिला असेल मात्र बीडमध्ये खड्डा चुकवनं मुश्कील झाल्याने, चक्क एका तरुणीला आपली स्कुटी हातात घेऊन जाण्याची वेळ आली. बीड शहरातील नगर नाका चौकात, गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. यावरून जाताना, खड्डा चुकवनं मुश्किल असल्याचं पाहून, स्कुटीवरील तरुणी आपली स्कुटी हातात घेऊन पायी गेली.

विशेष म्हणजे या खड्डेमय आणि चिखलमय झालेल्या रस्त्यावर अनेक अपघात (Accident) होतात. मात्र हा रस्ता ज्या बांधकाम विभागाकडे येतो, त्या बांधकाम विभागाचे कार्यालय आणि लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला, या महामार्गालगत असतांना देखील अधिकारी आणि आमदार केवळ बघ्याची भूमिका घेतात.

त्यामुळं या अधिकारी आणि लोकप्रतिनिधीविषयी बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल, किमान या रस्त्यांवरील खड्डे तरी तात्काळ बुजवण्याची सदबुद्दी या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



Post a Comment

0 Comments