देशभरातील "प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र" चे उद्घाटन करणार असून देशात २ लाख ८ हजार तर महाराष्ट्र मध्ये १४ हजार वरून अधिक, पुणे जिल्ह्यामध्ये ६५० पेक्षा जास्त तर मावळ तालुक्यात जवळपास ५० केंद्राचा समावेश यामध्ये आहे.
प्रतिनिधी रेखा भेगडे :भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने इंदोरी,दारुंब्रे, टाकवे बू, कामशेत, कढधे ई ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागतील भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांसह उपस्थित राहणार असल्याची माहिती मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी दिली आहे.
याच वेळी माननीय प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता २७-०७-२०२३ रोजी सकाळी ११ वा. राजस्थान मधील सिकर येथून वितरीत करणार आहेत. त्याचसोबत देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
मावळ तालुक्यातील शासनमान्य विक्रेत्यांच्या दुकानांनाच प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा दर्जा देण्यात आला असून. या केंद्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते, बी ,बियाणे, औषध आणि कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.
तसेच माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नव नवीन तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.यासाठी या केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. कृषी विभागाच्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे!
0 Comments