-->

Ads

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ‘मेगाब्लॉक


मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या – कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे या काळात लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर – दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता, सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेलवरून सीएसएमटीला जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूरला जाणारी लोकल सेवा रद्द केली आहे.पश्चिम मार्ग

डाऊन धिम्या मार्गावर

कुठे : मरिन लाइन्स ते माहीम
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत









 

Post a Comment

0 Comments