-->

Ads

भायखळा स्टेशनवर 'तो' लेडिज डब्यात चढला, सिगरेट पेटवली अन्... बदलापूर ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना

सीएसएमटी बदलापूर लोकलमध्ये महिला डब्यात नशेबाज तरुणाची दहशत पहायला मिळाली. चालू लोकलमध्ये सिगारेट ओढत महिला प्रवाशांना धमकावलं.



Mumbai Local Train News : मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर लोकलमध्ये एका गरदुल्याने धुमाकूळ घातला.  भायखळा रेल्वे स्थानकात हा तरुण महिलांच्या डब्यात चढला. विशेष म्हणजे सायंकाळी गर्दीच्या वेळेस हा सर्व प्रकार घडला आहे. 

काय घडलं नेमकं?



सायंकाळी 7.15 मिनीटांनी सीएसएमटी स्थानकाचून बदलापूर लोकल सुटली. ही लोकल भायखळा स्टेशनवर पोहचल्यानंतर  अचानक महिला डब्यात एक तरुण शिरला. हा तरुण गेटवर उभा राहून सिगारेट ओढत होता. डब्यातील महिलांनी त्याला दादरला उतरायला सांगितले. परंतु दादर स्टेशन आलं तरी हा तरुण उतरला नाही. उलट या तरुणाने लोकल मध्ये चढणाऱ्या इतर महिलांना देखील अडथळा निर्माण केला. सदर तरुण हा अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

कुर्ला स्थानकात पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले


महिलांनी सांगून देखील हा तरुण महिला डब्यातून दुसऱ्या डब्यात गेला नाही. उलट या तरुणाच्या विचित्र वागण्यामुळे डब्यातील काही महिला घाबरल्या होत्या. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झाल होते. काही महिलांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. अखेर रेल्वे पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकात या तरुणाला ताब्यात घेतले

Post a Comment

0 Comments