-->

Ads

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई- नाशिक महामार्गाची पाहाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गाची पाहाणी केली. मागील काही दिवसांपासून महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.


ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गाची पाहाणी केली. मागील काही दिवसांपासून महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाहाणी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांदर्भाचे वृत्त ही ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून तेथील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ . विनयकुमार राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments