तसेच दुसऱ्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Ahmedabad News: अहमदाबाद येथून आगीची एक मोठी घटना समोर आली आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयाला भीषण आग लागलीये. रविवारी पहाटे ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
१०० हून अधिक रुग्ण रुग्णालयात
पहाटेच्या वेळी आग लागली तेव्हा १०० हून अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये होते. या सर्वांना रुग्णालय प्रशासनाने तातडीने बाहेर काढले. तसेच दुसऱ्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीवर नियंत्रण मिळणव्यास यश
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदाबादमधील राजस्थान रुग्णालयाला पहाटे ४.३० च्या सुमारास तळघरात आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ५ तास अग्निशमन दलाचे जवान काम करत होते. पाच तासांनी आग शांत झाली आहे.
दरम्यान, अहमदाबाद शहरातील हे रुग्णालय फार मोठे आहे. येथे अनेक आजारांवर उपचार केले जातात. अन्य शहरांमधील नागरिक देखील या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. शहरातील बड्या रुग्णालयात ही घटना घडल्यानं रुग्णांसह इतर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे.
0 Comments