-->

Ads

आज इंदोरी येथे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचे शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले!

 



प्रतिनिधी रेखा भेगडे: या केंद्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनातील अनुदानावर उपलब्ध होणारी खते, बी ,बियाणे, औषध आणि कीटकनाशके या केंद्रावर अल्पदरात उपलब्ध होणार आहेत.तसेच माती परीक्षण, शेतकऱ्यांना पीक पद्धती बद्दल मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासह शेती संबंधी नव नवीन तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यासाठी या केंद्रांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.कृषी विभागाच्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती सहजरीत्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी यासाठी या प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे!



यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रशांत आण्णा ढोरे,गाव अध्यक्ष जगन्नाथ भाऊ शेवकर,प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेवकर, इंद्रायणी कृषी सेवा केंद्राचे प्रमुख भागूजी दादा दाभाडे,मा.सरपंच संदीप भाऊ काशीद,प्रगतशील शेतकरी जनार्धन नाना भेगडे,संजय नाना भेगडे,काशिनाथ आण्णा चव्हाण,ग्रा.सदस्य विनोद भाऊ भागवत,मुकेश भाऊ शिंदे,अरविंद भाऊ शेवकर,गणेश भाऊ दाभाडे,कृषी सहाय्यक स्वाती ताई घनवट यांच्यासह इंदोरी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते!




Post a Comment

0 Comments