मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली त्यामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
प्रतिनिधी रेखा भेगडे : मावळ परिसरात सुरु असलेल्या जोरदार पाऊसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली आहे .गुरुवारी 27 जुलै रात्री 8.45 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.मिळलेल्या माहितीनुसार कामशेतचा मोठा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर ही दरड आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.घटनेची माहिती समजताच एक्सप्रेस वेवरील देवदूत यंत्रणा व आय आर बी चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.मार्गात आलेले दगड व माती काढण्याचे काम करण्यात आले.
0 Comments