-->

Ads

पुसद येथील इटावा वार्ड येथे दुहेरी हत्याकांड...

 टोळक्याने कोयता व शस्त्राने केला हल्ला, दोन ठार तर एक गंभीर जख्मी



प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर:पुसद: काल मध्यरात्री एक वाजता ईटावा वार्ड येथे  चूघल्या का करतो ? याचा जाब विचारण्याच्या कारणावरून  सहा जणांनी मिळून संगनमताने मध्यरात्री घरावर हल्ला चढवला. त्यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री 1 वाजता ईटावा वार्ड पुसद येथे घडली. शहर पोलिसांनी मध्यरात्रीच खून, खूनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून तपासात सुरुवात केली आहे. 

यामध्ये राहुल हरिदास केवटे वय 45 वर्षे व क्रिश विलास केवटे वय 23 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला असून बंटी हरिदास केवटे वय 40 वर्ष हे गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. या हत्याकांडाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नयन अनिल केवटे वय सतरा वर्षे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पवन बाजीराव वाळके, अवि चव्हाण, निलेश दीपक थोरात गणेश शंकर तोडकर गोपाल शंकर कापसे गणेश शंकर कापसे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले शहर पोलीस ठाणेदार उमेश बेसकर व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आरोपीच्या शोध कामी लागली आहे..







Post a Comment

0 Comments