पावसाळी अधिवेशनात आमदार श्री. सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात ही मागणी मांडली.
पुणे:- रेखा भेगडे:पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या सर्वेक्षनानुसार मावळ तालुक्यातील भुशी ,बोरज्,ताजे,गभाले वाडी ,मोरमारेवाडी ,माऊ ,तुंग ,मालेवाडी, लोहगड ,पाले ना.मा.,नायगाव ,साई ,वाउंड ,कल्हात्,सावळा ,टाकवे खुर्द,शिलाटणे ,सांगिसे,नेसावे,ई.गावंमध्ये भुसखलानाचा धोका निर्माण होऊ शकतो .तर यातील बोरज ,माऊ ,भुशी ,कळकराई, मालेवाडी,तुंग ,लोहगड,आणि ताजे ही 8 गावे अतिसंवेदनशील असल्याची धक्कादायका बाब निदर्शनास आणून दिली.
अशा धोकादायक् ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारकडून कुटुंबियाणा नुकसान भरपाई देण्यात येते.तेथील वाडी ,वस्तीचे ,गावाचे ,पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येतो .परंतु अशा गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठीं ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात .या गावांचा गांभीर्यने विचार होऊन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी मावळचे आमदार श्री.सुनील शेळके यांनी अधिवेशनात मांडली.
0 Comments