-->

Ads

आकोली गावचा तरुण बनला पोलीस अधिकारी

 

प्रतिनिधी:संजय जाधव:ढाणकी शहराजवळ असलेल्या आकोली गावची लोकसंख्या काही हजारावरच आहे जिल्ह्यापासून दूर आणि तालुक्याचे अंतर बरेचसे असून सर्वसाधारण मध्यमवर्गीय या ठिकाणी राहतात शिक्षण आणि भौतिक सुखाची कुठे ना कुठे उणीव असताना ध्येय निश्चित करून आई वडिलांच्या अपेक्षेचे ओझे पूर्ण करणे ही साधी बाब नाही विशेष म्हणजे घरातील किंवा भाऊबंदकीतील कोणीही शिकून मार्गदर्शन करेल अशी कुटुंबाची पार्श्वभूमी नसताना अरविंद सुभाष राठोड हा आकोली येथील तरुण आज पोलीस विभागात अधिकारी झाला  वडीलाकडे जेमतेम चार एकर कोरडवाहू शेती असताना आपल्या रोजच्या व्यवहारातून बचत करून आणि पोटाला कुठेतरी चिमटा घेऊन वडिलांनी आपल्याला जी रसद पोहोचवली त्याची जाण ठेवून अरविंद ने सुद्धा प्रयत्न केले व त्यांना त्यात यश मिळाले त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक तर होतच आहे शिवाय गावात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा अरविंद यांचा  नेत्रदीपक सत्कार करण्यात आला हा  सोहळा पार पडत असताना अरविंद राठोड यांच्या आई वडिलांचे डोळे अश्रूनी  डब डब लेले दिसत होते ते यासाठी की एवढ्या खडतर परिस्थितीत सुद्धा मुलाने आपल्या कष्टाचे चीज केले यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक प्राथमिक शाळेतील मुले कॉलेजमधील तरुण व दिवसभर काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करणारा मजूर वर्ग सुद्धा अरविंद ला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होता. स्वतःचे ध्येय ठरवून  मार्गदर्शक पण स्वतः बनावे लागले आणि नंतर  कर्मातील सातत्य मी कायम ठेवले म्हणूनच यश मिळाले पुढे बोलताना अरविंद म्हणाला महाराष्ट्र  राज्य लोकसेवा आयोग कठीण परीक्षेचा अभ्यास सुरू केला त्यावेळी स्वतःच्या प्रकृतीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही अशा काळामध्ये सकारार्थी विचाराची नितांत गरज असते त्यामुळे अगदी परीक्षा काही दिवसावर असताना नियमितपणे व्यायामात सातत्य ठेवले होते. अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात परंतु व्यायाम व पुरेशी झोप आणि आराम ही तितकाच महत्त्वाचा असतो तसेच मित्र व कुटुंबातील मंडळी कडून नेहमीच मिळणारे प्रोत्साहन हे खूप मोठे ऊर्जेचे काम करते व मोलाची भूमिका बजावते परीक्षेपूर्वी योग्य नियोजन महत्त्वाचे असते व परीक्षा केंद्रावरही डोकं शांत ठेवून प्रश्न सोडविणे जरुरी असून गोंधळून न जाता संपूर्ण प्रश्न समजावून घेऊन पूर्ण पेपर मधील प्रश्न सोडविणे महत्त्वाचे ठरते अशा पद्धतीने परीक्षेची तयारी करण्यासाठी अरविंद यांनी काही कानमंत्र उपस्थित असलेल्या तरुणांना दिले परीक्षा काही दिवसावर आल्यानंतर अभ्यासाची गती वाढविण्यापेक्षा त्यात सातत्य ठेवल्यास अभ्यास व्यवस्थित होऊन गोंधळ उडत नाही कारण अशा परीक्षेची अभ्यासाची व्याप्ती खूप मोठी असते त्यामुळे अभ्यासात निरंतरता कायम असल्यास व त्याची उजळणी करत राहिल्यास दडपण कमी होऊन यशाची  वाटचाल सुकर होते असे यावेळी अरविंद मनाला.




Post a Comment

0 Comments