लोक नदी किनारी, समुद्राच्या कडेला फिरायला जातात. यावेळी अनेकजण पाण्यात जाऊन खेळतात तर काहीजण किनाऱ्यावरील मातीतच मजा मस्ती करतात.
नवी दिल्ली, 12 जुलै : लोक नदी किनारी, समुद्राच्या कडेला फिरायला जातात. यावेळी अनेकजण पाण्यात जाऊन खेळतात तर काहीजण किनाऱ्यावरील मातीतच मजा मस्ती करतात. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंद लुटताना दिसतात. मात्र कधी कधी हा आनंद खूपच महागात पडतो. मजा मस्ती अंगलट येते. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एका मुलाला समुद्र किनारी मस्ती भोवली. त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला याचा व्हिडीओही समोर आलाय.
एक मुलगा समुद्र किनारी मातीमद्ये खेळत होता. त्यानं स्वतःला मातीमध्ये अर्ध पुरुन घेतलं होतं. त्याची ही मस्ती त्याच्या जीवावर बेतली असती. त्याच्या शरिरात किडे शिरले. जे की खूपच जीवघेणे होते.
ही घटना 17 वर्षाच्या मायकल सोबत घडली. तो आणि त्याचे मित्र समुद्र किनारी फिरायला गेले होते. यावेळी त्यानं स्वतःला मानेपर्यंत मातीमध्ये पुरुन घेतलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा हलगर्जीपणा त्याला किती महागात पडला. त्याच्या शरिरात किडे शिरले. सर्वात पहिले मायकलच्या शरिराला खाज सुटायला सुरुवात झाली. नंतर हळू हळू चट्टे पडू लागले. हे वाढू लागल्यावर तो त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, मायकलच्या शरिरात किडे शिरले होते म्हणून त्याला हा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्याच्या शरिरातील किडे वरुनही दिसू लागले. शरिराला फोड आले. व्हिडीओमध्ये असं सांगितलं की, समुद्राच्या किनाऱ्यावर हे किडे लपलेले असतात. कुत्र्याच्या शी मुळे हे मातीत पसरतात. त्यामुळे समुद्र किनारी फिरायला जाताना सावधानता आणि काळजी घेण्याची गरज आहे.
0 Comments