-->

Ads

धक्कादायक! देवाच्या दारीच चोरी.. श्रीराम मंदिरातील दान पेटीवर चोरट्याचा डल्ला; घटना सीसीटिव्हीत कैद

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील श्रीराम मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरट्यानं मंदिरातील तीन दानपेटीचं कुलूप तोडून त्यातील 15 हजारच्या आसपास असलेली रोकड चोरुन नेली आहे.


चोरट्यानं मंदिराच्या लोखंडी जाळीच्या गॅप मधून मंदिरात प्रवेश करत ही चोरी केली असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात 1986 साली उभारण्यात आलेल्या  श्रीराम मंदिरात रविवारी चोरी झाली. दावडी परिसरातील हे सर्वात जुनं मंदिर असून एवढ्या वर्षात प्रथमच मंदिरात चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक हरीशंकर पांडेय यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्यानं मंदिरातील तीन दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरली आहे. 15 हजाराच्या आसपास ही रक्कम असेल. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मध्यरात्री 12.30 च्या सुमारास चोरटा मंदिरात आला असल्याचे दिसत आहे.


Post a Comment

0 Comments