-->

Ads

महागाव तालुक्यात पावसाचा हाहाकार ; शेतकऱ्यावर आभाळ कोसळले ; माजी आमदार राजेंद्र नजरधने , जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी घेतला परपरिस्थितीचा आढावा




महागाव : संजय जाधव


    मागील २४ तासापासू महागाव तुफान तालुक्यात पावसाने हाहाकार झाला आहे.प्रचंड पावसाने अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे.बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे

तालुक्यातील.पूरपरिस्थिती चा माजी आमदार राजेंद्र नजर धने यांनी आढावा घेतला आहे.शक्य तितक्या लवकर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम पाचारण करण्याच्या सूचना नजरधने यांनी दिल्या असून वेळ प्रसंगी नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर बोलावण्याचा तयारीने प्रशासन कामाला लावण्यात आल्याची माहिती यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिली आहे.


माजी आमदार राजेंद्र नजरधने आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा तालुक्यात प्रशासनासमवेत तळ ठोकून आहेत.तालुका प्रशासनाचे उपविभागीय महसूल अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार संजीवनी मुपडे, नायब तहसीलदार एस.देशमुख , परि. पोलिस अधिक्षक विनायक कोते . ठाणेदार ढोमणे पाटील, मंडलाधिकारी संजय नरवाडे , राम पंडीत, तलाठी दिपक दिवेकर तालुक्यातील प्रत्येक गावांचे ताजे अपडेट घेत असून आपत्कालीन स्थिती वेळी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.त्यासाठी प्रशासनाने आपत्कालीन स्थितीतील नागरिकांसाठी मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर टाकले आहेत.


महागाव तालुक्यातील आनंदनगर - अनंतवाडी येथील ३८ नागरिकांच्या घरणाच्या पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने ते अडकले आहे. हिवरा - खडका दरम्यान असलेल्या शिप नदीला पूर असल्याने वाहतूक सकाळी ६ पासून विस्कळित झाल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. धनोडा येथे 

जिल्हा व तालुका प्रशासन त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. तिवरंग, गुंज , राहुर , गावात पाणी शिरले आहे.त्यामुळे अनेक घरांत २-३ फूट पाणी आहे.महागाव शहरातील प्रभाग ६,१०, आणि २ मध्येही स्थिती गंभीर होत चालली आहे.पाण्याची पातळी वाढत चालल्याने प्रशासन रेस्क्यु टीमला पाचारण केले आहे.


प्रशासनाने आपत्कालीन स्थिती लक्षात घेता हेलिकॉप्टर लँडिंग करण्यासाठी जागेची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती नितीन भुतडा यांनी दिली आहे.छत्तीसगढ राज्यातून रायपूर येथून हेलिकॉप्टर नागपूर व्हाया यवतमाळ पाचारण करण्यात आले आहे.काही तासात येणार असल्याची माहिती भुतडा यांनी दिली आहे.

अधर पुस प्रकल्पाचे पाणी पातळी वाढल्याने ४ वक्रद्वार ५० सेमी ने उघण्यात आले आहे.त्यामधातून २०० क्युमेक्स ने पाण्याचा विसर्ग होणार असल्याने नदी नाल्याच्या गावांना सतर्कतचाइशारा देण्यात आला आहे.

महागाव शहरातील उमरखेड रोडवरील नागझरी , फुल सावंगी रोडवरील नाला पूर्णपणे भरला पूरस्थिती आहे. त्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.नाल्यालगत असलेल्या शहाबाज सुरैय्या लकी मोबाईल , सुनील राऊत यांचे भुसार दुकान ,अनुप ठाकरे यांचे हार्डवेअर , आदी दुकान

( बरेच दुकान आहेत.नावे शक्य नाहीत)


..........

तालुक्यातील सविस्तर माहिती घेणे सुरू आहे

Post a Comment

0 Comments