-->

Ads

पुणे दहशतवादी अटक प्रकरणाला नवे वळण, ATS कडून अल सफाच्या रतलाम मॅाड्युलचा पर्दाफाश, 2 तरुणीही रडारवर

आणखी 6 आरोपी अल सफाच्या रतलाम मॅाड्युलमध्ये सक्रिय असल्याच एटीएसच्या तपासात उघड झालं आहे. यामध्ये 2 मुलींचाही समावेश आहे.


पुणे:- रेखा भेगडे: पुण्यात काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तिसरा आरोपी कातिल दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीरला अटक करण्यात आली आहे.  मुळचा गोंदियाचा असलेला कादीरवर लॅाजिस्ट्कची जबाबदारी सोपवण्यात आली होती.मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना राहण्याच्या सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कातिल दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीरवर होती. 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर ‘अल सफा’च्या रतलाम मॅाड्युलचा पर्दाफाश झाला आहे. 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तिसरा आरोपी सुद्धा सापडला आहे. आणखी 6 आरोपी अल सफाच्या रतलाम मॅाड्युलमध्ये सक्रिय असल्याच एटीएसच्या तपासात उघड झालं आहे.

यामध्ये 2 मुलींचाही समावेश आहे. जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली अलिफिया नामक अल सफाची सक्रिय महिला ही एटीएसच्या रडारवर आहे.पुण्यात स्फोट घडवण्याचा कट होता दरम्यान, पुण्यात स्फोट करण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने एकाला गोंदियातून अटक केली. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या 2 दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला समजली होती.कोथरूड पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत आठ दिवसांपूर्वी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) यांना गाडी चोरताना अटक केली होती.

त्यांच्या कडे अधिक तपास केल्यांवर हे दोघे वॅांटेड दहशतवादी असल्याच तपासात समोर आल होते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लॅपटॅाप चार फोन एक टॅब्लेट काही पेनड्राईव्ह तपासात जप्त करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांकडून हा तपास एटीएसला वर्ग केल्यानंतर या तपासात काही धक्कादायक खुलासे झाले आहे.


Post a Comment

0 Comments