-->

Ads

कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसने 3 कामगारांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

 Accident News : कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते.


Kasara News : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानकाजवळ एक दुर्दैवा घटना घडली आहे. अचानक आलेल्या एक्सप्रेस ट्रेनने 3 कामगारांना धडक दिली आहे. यामध्ये 3 कामगारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

कामगार कल्याण, नासिक, इगतपुरी येथील असून हे कामाला कसारा रेल्वे स्टेशनला होते. पॉईंटवर हे तीन कामगार काम करत असताना अचानक एक्स्प्रेस आली. पाऊस जोरात असल्याने या कामगारांच्या एक्स्प्रेस आल्याचं लक्षात आलं नाही. एक्स्प्रेसने तिन्ही कामगारांना उडवले. त्यातील एक कामगार ट्रॅकखाली आल्याने मृत्यू झाला आहे.


Post a Comment

0 Comments