-->

Ads

2 तरुण मुलींसह आईचे टोकाचे पाऊल, या अवस्थेत दिसले तिघांचे मृतदेह, पोलीस म्हणाले,

प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळाली आहे की, महिलेच्या एका मुलीचे गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते.


एटा, 30 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. यासोबतच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलींसह एका महिलेने टोकाचे पाऊल उचलत सामूहिक आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

उत्तरप्रदेशच्या एटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी दोन मुलींसह त्यांच्या आईने गळफास घेत आत्महत्या केली. अनुराधा असे मृत महिलेचे तर संध्या (17) आणि शिवी (16) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. आई आणि मुलींच्या आत्महत्येची ही घटना समोर येताच निधौली कलां पोलीस ठाणे परिसरातील मील गढी गावात एकच खळबळ उडाली.

मील गढी गावात दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली. तीन जणांच्या आत्महत्येची माहिती मिळताच जिल्हा वरीष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक धनंजय सिंह कुशवाह यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचे निरीक्षण केले.

पोलीस काय म्हणाले -अप्पर पोलीस अधीक्षक धनंजय सिंह कुशवाह यांनी सांगितले की, एक महिला आणि तिच्या दोन मुलींनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळाली आहे की, महिलेच्या एका मुलीचे गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते आणि प्रियकराकडूनही तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न झाला होता. कुटुंबात अंतर्गत वाद होता. याप्रकरणी पोलीस प्रत्येक बाजूने कसुन तपास करत आहे. तपासाअंती योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments