Pune News: पुणे शहरात काल रात्री दोन टोळ्यांच्या पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात सहकारनगर येथील अण्णाभाऊ साठे वस्तीत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी रहिवाशांच्या घराच्या दरवाजावरही कोयत्याने वार करत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सहकारनगर हद्दीत आणाभाऊ साठे वस्तती काल रात्री दोन वाजताच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी १० ते १२ दुचाकी फोडल्या होत्या, हा सगळा प्रकार जुन्या वादातून घडला असावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, सहकारनगर हद्दीत या पूर्वीही टोळी युद्धाच्या वादातून नागरिकांच्या गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सहकारनगर पोलीस स्टेशनवर गुन्हे शाखेच्या अखत्यारीत ठेवण्यात आले होते. परंतु, तरीही याचा काही उपयोग होताना दिसत नाही. गुन्हेगार प्रवृत्तीच्या टोळ्या सरेआम पुणे शहरात दहशत माजवण्याचं काम करतच आहे.
अण्णाभाऊ साठे वस्तीत गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाची एका स्थानिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आज सकाळीपासून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्याच काम सुरू आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशन आणि गुन्हा शाखेचे पथक २ करत आहेत.
0 Comments