-->

Ads

Mumbai News: घटस्फोटानंतर डोक फिरलं; धावत्या रिक्षात तरुणाचा घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला

 Mumbai News: मुंबईत धावत्या रिक्षात तरुणाने घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Mumbai News: मुंबईत धावत्या रिक्षात तरुणाने घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने धावत्या रिक्षात घटस्फोटीत पत्नीच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारली. सांताक्रूझ कलीना येथे ही घटना घडली. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्यात वारंवार क्षुल्लक कारणावरून भांडणे व्हायची. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला होता. यामुळे गेल्या एक महिन्यापासून महिला वेगळी राहत होती. आज ही महिला कामावर जात असताना या तरुणाने जीवघेणा हल्ला केला.

घाबरलेल्या या महिलेने जीव वाचवण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. तर हल्लेखोर तरुण आणि रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हनिफ असे आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर व्हि. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

महिला कामाला जाण्यास निघाली होती. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तिचा घटस्फोटीत पती हा तिच्यामागे आला. या तरुणाने तिला रिक्षा चालकास महिलेचा पती सांगून तिला जबरदस्तीने रिक्षात बसविले. त्यानंतर रिक्षा सुरू करण्यास सांगितली .

घटस्फोटीत पतीने जबरदस्तीने रिक्षात बसविल्याने जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर या घटस्फोटीत पती हनिफने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. त्याने घटस्फोटीत पत्नीच्या पोटात चाकू भोसकला. त्याने पुन्हा एकदा चाकू मारण्यास सुरुवात केल्यानंतर महिलेने त्याला धक्का मारून रिक्षातून उडी मारली. त्यानंतर घटस्फोटीत पती आणि रिक्षा चालकाने पळ काढला.

दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला स्थानिक लोकांनी जवळील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी घटस्फोटीत पतीवर वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments