-->

Ads

Kolhapur News : आक्षेपार्ह पोस्टनंतर तणाव, बंदची हाक; मुस्लिम समाजाकडून एकोप्याचं आवाहन

 

कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाकडून एक पत्रक काढून एकोप्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच अपप्रवृत्तींना पोलिसांनी वेळीच रोखावं असंही म्हटलं आहे.

कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्टनंतर तणाव

कोल्हापूर, 07 जून : कोल्हापुरात राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केले. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली.

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. याशिवाय जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे करण्यासही मनाई असणार आहे.

Post a Comment

0 Comments