-->

Ads

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे


  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना सोशल मीडिया वरून दाभोळकर करण्याची धमकी देण्यात आली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली होती. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत पुण्यातून एकाला अटक केली आहे. सागर बर्वे अस अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असल्याची माहिती मुंबई पोलिसानी दिली आहे. मुबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी एका 34 वर्षीय इंजिनिअरला अटक केली आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या सागर बर्वे या आरोपीने वेगळ्या नावाने आयडी तयार करून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट टाकली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सागर बर्वेला पुण्यात अटक करून मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (13 जून) पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच तुमचा दाभोळकर होईल, अशी धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती.  प्राथमिक तपासानुसार सागर बर्वे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. मात्र, त्याच्या या कृत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Post a Comment

0 Comments