-->

Ads

Buldhana Accident News: भीषण अपघात..प्रसुतीसाठी जात असलेल्‍या महिलेच्या अंगावरून गेला ट्रक; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

भीषण अपघात..प्रसुतीसाठी जात असलेल्‍या महिलेल्‍या अंगावरून गेला ट्रक; भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, चौघांचा मृत्‍यू


बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील बायपासवर ट्रक व खासगी ट्रॅव्‍हल्‍स्‌चा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.मृतकांमध्ये नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश आहे.

सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे मलकापूर बायपासवर टायर पंचर झाले. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात टायर बदलत असलेल्या चालकाच्या आणि बाजूला बसलेल्या गरोदर महिलेच्या अंगावरून ट्रक गेले. नऊ महिन्यांची गरोदर महिला अंजली जाधव हिचा उपचार दरम्यान बुलढाणा येथे मृत्यू झाला. अंजली जाधव ह्या सुरतवरून आपल्या माहेरी प्रसूतीसाठी जात होत्या.

दुभाजकावर धडकला ट्रक

ट्रॅव्‍हल्‍सला धडक दिल्‍यानंतर आयशर ट्रक दुभाजकावरील पोलवर जावून धडकले. ज्यामध्ये ट्रकमधील चालक, क्लिनर आणि ट्रॅव्हल्स चालक यांचा जागीच मृत्यू झाला.





Post a Comment

0 Comments