-->

Ads

सहा महिन्यांपासून पत्नी बोलेना, म्हणून तो सासरी गेला; जे झालं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली

Husband Wife: एका व्यक्तीची पत्नी लग्नाच्या महिन्याभरातच आजारपणाचा बहाणा करुन माहेरी गेली. त्यानंतर तिने त्याच्याशी फोनवर बोलणंही बंद केलं. दोन वर्ष झाले पत्नी घरी परतली नाही म्हणून तो तिला घ्यायला गेला. पण, पत्नीच्या घरी पोहोचताच त्याला जे कळालं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.


पाटणा: अंद्धश्रद्धेमुळे एका व्यक्तीची पत्नी तांत्रिकासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या कैमूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी पळून गेल्याची माहिती व्यक्तीच्या सासरच्यांनी त्याला दिलीच नाही. जेव्हा तो पत्नीला घ्यायला सासरी पोहोचला तेव्हा त्याला या घटनेची माहिती मिळाली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

सासरच्यांनी काहीही सांगितलं नाही

सासरच्यांनी याबाबत जावयाला काहीही माहिती दिली नाही. तो जेव्हा सासरच्या घरी आला तेव्हा त्याला समजले की त्याची पत्नी तांत्रिकासोबत पळून गेली आहे. याप्रकरणी भभुआ पोलिस ठाण्यात छोटू कुमार नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी आणि तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

दोन वर्षांपासून पत्नी माहेरीच होती

पीडित पतीने सांगितले की, डिसेंबर २०२० मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या १ महिन्यानंतर म्हणजे जानेवारी २०२१ रोजी पत्नीची तब्येत बिघडल्याने ती माहेरी राहायला आली. दरम्यान, दोघेही फक्त फोनवरच बोलत असत. कारण, पती नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशात राहत होता. त्याने तिला उत्तर प्रदेशात बोलावले असता तिने उपचाराच्या बहाण्याने येण्यास नकार दिला होता. त्यानंतर ६ महिन्यांपूर्वी पत्नीने फोनवर बोलणेही बंद केले.

पत्नीला घ्यायला सासरी गेला, खरं ऐकून पती हादरला

जेव्हाही तो पत्नीला फोन करायचा तेव्हा सासरे फोन उचलायचे. सतत तेच तेच होत असल्याने त्याला संशय आला. त्यामुळे त्याने स्वत: जाऊन पाहायचे ठरवले. तो २५ जून रोजी सासरच्या घरी पोहोचला. तिथे त्याला त्याची बायको दिसली नाही. त्यामुळे त्याने तिच्या वडिलांना विचारले की माझी बायको कुठे आहे. तेव्हा त्याला कळालं की त्याची बायको तांत्रिकासोबत पळून गेली आहे. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.


 

Post a Comment

0 Comments