-->

Ads

नाशिकमध्ये धार्मिक विधीसाठी हजेरी, परतीचा प्रवास ठरला अखेरचा, कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी

Dhule Accident : धुळे जिल्ह्यात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिकहून धार्मिक विधी आटोपल्यानंतर निघालेल्या कुटुंबावर काळा घातला आहे. चार जण जखमी झाले आहेत.

 
धुळे : गंध मुक्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर नाशिकहून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळानं घाव घातला आहे. भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. नाशिकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यतील नवलनगरजवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले तर चार जण जखमी झाले. 
हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झाला. सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत.नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील एक कुटुंब कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होतं. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण हाेते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments