सुकळी नवीन येथील १४ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सुकळी येथे घडली .त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर उमरखेड; सुकळी नवीन येथील १४ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सुकळी येथे घडली .त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत बालकाचे नाव वैभव विजय जाधव असं होत.
तो १४ वर्षाचा होता.वैभव नुकताच आठवीला गेला होता.त्याच्या कुटुंबात आई वडील , लहान भाऊ , बहीण आहे . आईवडील हे मजुरी करतात . वैभव शुक्रवारी संध्याकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान घरा जवळ बांधलेली म्हैस आणण्यासाठी बाहेर गेला होता पण बराच वेळ होऊन देखील तो घरी परत आला नाही . त्यामुळे त्यामुळे त्याच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर त्याचा शोध घेतला.
अखेर सकाळी नवीन गावाजवळील विद्युत सबस्टेशन बाजूच्या नाल्या लगत लिंबाच्या झाडाला वैभव दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १४ वर्षीय वैभवने फाशी का घेतली?की त्याच्या सोबत काही घातपात झाला आहे. हे चौकशी नंतर समोर येईल पण त्याने आत्माहत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावल्या जात आहे . या घटनेची माहिती पोलीस पाटील वाघाजी जाधव यांनी पोफाळी पोलीस स्टेशनला देताच लगेच पोफाळी पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
0 Comments