Crime News: बिहारमध्ये एका महिलेची हत्या कऱण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर सासरचे लोक घाईत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्याने घटनास्थळी दाखल होत अंत्यसंस्कार रोखले. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मंगळसूत्राते तुटलेले तुकडे आणि कपडे जप्त केले आहेत. मृत सूनेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सूनेचं दीड वर्षांपूर्वी पनयपूर गावातील रुदल यादवशी झालं होतं. पण लग्नानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये हुंड्यावरुन वाद सुरु झाला होता. यानंतर नवविवाहित सूनेचा छळ सुरु झाला. शेवटी 21 वर्षीय सोनमच्या कुटुंबाची सासरच्यांनी हत्या केली. यानंतर ते मृतदेह जाळण्यासाठी शेतात घेऊन गेले. पण गावातील लोकांनी सोनमच्या माहेरच्या लोकांना याची माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनाही मृतदेह जाळण्यात येत असल्याचं कळवण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि घटनास्थळी सुरु असलेले अंत्यसंस्कार रोखले. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसंच तपास सुरु केला आहे.
लखीसराय जिल्ह्याच्या लक्ष्मीपूर गावातील विनोद यादव यांच्या 21 वर्षीय मुलीचं दीड वर्षांपूर्वी शेखोपुर सराय प्रखंड गावाचे रहिवासी दिनेश यादव यांचा मुलगा रुदल यादवशी झालं होतं. पण त्यांनी हुंड्यावरुन सुनेचा छळ सुरु केला होता. याचदरम्यान, बुधवारी रात्री सोनमची हत्या करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहोचताच सर्व आरोपी फरार झाले.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. विसरा रिपोर्ट आल्यानंतरच नेमकी कशाप्रकारे हत्या करण्यात आली हे स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक स्वत: जातीने या प्रकरणी तपास करत आहेत. पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्याला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
0 Comments