-->

Ads

भावासोबत खेळताना बाईक अंगावर पडून मृत्यू, तीन वर्षांच्या चिमुकल्याने जाता जाता चौघांना जीवनदान दिलं

  डोंबिवलीमध्ये राहत असलेल्या हा तीन वर्षांचा मुलगा ५ जूनला आपल्या मोठ्या भावासोबत घराबाहेर खेळत असताना जवळच असलेली मोटारसायकल त्याच्या अंगावर पडली. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला होता.

ठाणे: मोठ्या भावासोबत घरात खेळताना झालेल्या अपघातात डोंबिवलीतील तीन वर्षांच्या मुलाच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मेंदूमृत झाल्याने पालकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे.

डोंबिवलीमध्ये राहत असलेल्या हा तीन वर्षांचा मुलगा ५ जूनला आपल्या मोठ्या भावासोबत घराबाहेर खेळत असताना जवळच असलेली मोटारसायकल त्याच्या अंगावर पडली. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला वाडिया रुग्णालयात नेण्यास सांगितले. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतरही त्याची प्रकृती गंभीर झाली आणि डॉक्टरांनी ९ जूनला त्याला मेंदूमृत घोषित केले. स्थानिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीसोबत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० जूनला त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. या मुलाचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आल्याने चौघांना जीवदान मिळाले आहे.


Post a Comment

0 Comments