-->

Ads

कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.



रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका लेनचे काँक्रिटीकरण सुरु आहे. पावसाळा आला तरी काम पूर्ण झाले नसल्याने पनवेल-पेण मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु आहे. याच मार्गावर पळस्पे गावच्या हद्दीत भावना फोर्ड शोरूमसमोर आज (२४ जून) सकाळी साडे सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. गेले कित्येक वर्ष रडतखडत काम सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग अजून किती जणांचे जीव घेणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

भरधाव येणारी अवजड वाहने, रस्त्यावर जागोजागी बेशिस्तपणे पार्क केलेले कंटेनर, पावसामुळे निसरडा झालेला मार्ग, एकेरी वाहतुकीमुळे अरुंद रस्ता, या सगळ्याचा परिणाम होऊन अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत. याच मार्गावर पळस्पे गावच्या हद्दीत भावना फोर्ड शोरूमसमोर आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.

पनवेल - गिरवले येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका ललिता ओंबळे त्यांच्या दुचाकीवरून शाळेत जायला निघाल्या होत्या. त्यावेळी भावना फोर्ड शोरुमजवळ त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने कट मारली. यानंतर दुचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तोल जाऊन ललिता ओंबळे रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी एकेरी लेनवरून भरधाव येणाऱ्या कंटेनर त्यांच्या अंगावरून गेला. कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. रक्तबंबाळ होऊन त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. चिंचवली गावातील सामाजिक कार्यकर्ते परेश ठोंबरे यांच्यासह तरुणांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.










Post a Comment

0 Comments