राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारयांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या दंगली तसंच देशात चर्चवर होणार हल्ले यावर चिंता व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारला 9 वर्षं पूर्ण झाली आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोण आहे? असं विचारलं असता शरद पवार यांनी सांगितलं की, "शासन तुमच्या हाती आल्यानंतर तुम्ही काहीतरी निकाल दिला पाहिजे. त्यामध्ये नितीन गडकरी आहेत. ते पक्षीय दृष्टीकोन ठेवत नाहीत. एखादा प्रश्न सांगितला तर कोण सांगतंय यापेक्षा प्रश्न किती महत्त्वाच आहे याकडे त्यांचं लक्ष असतं. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. पण हा अनुभव फक्त त्यांच्याबद्दलच आहे".
0 Comments