-->

Ads

घरातून दुर्गंधी, पोलीस पोहोचले, दार उघडले; आजी १८ वर्षीय नातवाच्या मृतदेहाला आंघोळ घालत होती

घरातून सतत दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कॉल केला. पोलीस पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडला. आत एक वृद्ध महिला. तिच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह होता.




लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बाराबांकीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहा दिवसांपासून एक आजी नातवाच्या मृतदेहासोबत राहत होती. मृतदेहाची दुर्गंधी वसाहतीत पसरली. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

आजी तिच्या नातवाच्या मृतदेहाजवळ बसली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यातून खूप दुर्गंधी येत होती. त्यामुळे अनेक पोलिसांना उलट्या झाल्या. सीओ बिनू सिंह यांनी वृद्ध महिलेला उपचारांसाठी पाठवलं आणि तपास सुरू केला. महिलेची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नातवाचा मृत्यू नेमका कसा झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

वृद्धेच्या काही शेजाऱ्यांनी सोमवारी सकाळी पोलिसांना फोन केला. मोहरिपुरवा मोहल्ल्यात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घरात काहीतरी घडलं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी महिलेचं घर गाठलं. घराचं दार उघडताच पोलिसांना धक्काच बसला.

वृद्ध महिला १८ वर्षांच्या मुलाच्या कुजलेल्या मृतदेहाला आंघोळ घालत होती. मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या घरातून दुर्गंधी येत होती. महिलेच्या नातवाचं नाव प्रियांश होतं. प्रियांशच्या आई वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. तो त्याच्या आजीच्या घरी राहायचा. त्याचा मृत्यू कसा झाला याबद्दल शेजाऱ्यांना कोणतीच कल्पना नाही.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वृद्ध महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पाठवलं. नातवाचा मृत्यू १० दिवसांपूर्वीच झाल्याचं महिलेनं सांगितलं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर प्रियांशच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


 






Post a Comment

0 Comments