राजकारणात मतभेद असतात पण द्वेष ज्या पद्धतीने पसरला जातोय ते वाईट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. या प्रकरणाचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केलीय.
मुंबई, 09 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी दिली गेली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. मुंबई पोलीस आय़ुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अशी धमकी येणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी एका युजरने दिली आहे. त्याने तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला पोहोचल्या असून ट्विटरवरून आलेल्या धमकीची कल्पना त्यांना देणार आहेत.
शरद पवार यांना आलेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना आलेली धमकी अत्यंत दुर्दैवी आहे. यानंतर काही घडल्यास याला महाराष्ट्राचे आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलं.
वेबसाईटवरून धमकी दिली जात आहे. अशा धमक्या येत असतील तर गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मुंबईच्या पोलीस आयुक्तांसमोर मांडलाय. पवारांना आलेली धमकी दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद असतात पण द्वेष ज्या पद्धतीने पसरला जातोय ते वाईट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. या प्रकरणाचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य न्याय मिळावा. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात गुन्हे वाढत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष द्यावं महाराष्ट्रात काय चाललंय ते पहावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक मुलगा सोलापूरमध्ये दोन मुलींसोबत कॉफी पित होता, प्राध्यापकही त्यावेळी होते. तेव्हा कोणीतरी मुले आली आणि त्यांना मारलं. कोण कुठला हे न पाहता मारहाण केली गेली. हे गुंडाराज आहे का? सोलापूरसारख्या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांसोबत कॉफी पिऊ शकत नसतील तर व्यवस्थेचं अपयश आहे.
0 Comments