Navi Mumbai News: सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अल्पवयीन मुला- मुलींवर लक्ष देणे गरजेचे बनले आहे. पनवेल शहरातील एका अल्पवयीन मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मागून त्याआधारे ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई : सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अल्पवयीन मुलं- मुलींमध्येही वाढलेला पाहायला मिळतो . नाण्याला जशा दोन बाजू असतात अगदी तशाच प्रकारे सोशल मीडियाला देखील दोन बाजू आहेत. स्मार्ट फोनच्या जमान्यात लहान मुलांच्या हातात देखील पुस्तकांऐवजी मोबाईलच दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन जोडप्यांच्या प्रेम प्रकरणाला बहुतांशी सोशल मीडियाच कारणीभूत ठरू लागलायचे चित्र आहे. मोबाईल मधील वेगवेगळ्या अँपद्वारे एकमेकांशी संवाद साधून व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलून प्रेमात पडलेली सध्याची पिढी भरकटत जात असल्याचे दिसून येते. यातून टोकाचे पाऊल उचलणे, गुन्हेगारी करणे असे अनेक प्रकार सरार्सपणे घडू लागले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर मुलीची स्नॅपचॅटवर सिराज अहमद आबीद अली चौधरी (वय १९) याच्यासोबत ओळख झाली. यानंतर त्याने मुलीचा विश्वास संपादित करून तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ मिळवले होते. याच फोटोंच्या आधारे आरोपी तिला धमकावत होता. यासाठी तो पनवेलला येऊन तिला भेटून देखील गेला. यावेळी देखील त्याने तिच्यासोबत फोटो काढले होते. त्यानंतर त्याने सदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कुटुंबीयांकडे ५० हजाराची मागणी केली होती.
या प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीच्या पालकांनी पनवेल तालुका पोलिसांकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच पनवेल पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सिराजची माहिती मिळवून नाशिक गाठले. त्या ठिकाणावरून सिराज याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सिराज हा गॅरेज कामगार आहे. त्याच्यावर बालकांच्या लैंगिक शोषणासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशाच प्रकारे त्याने इतरही कोणत्या मुलींना ब्लॅकमेल केले आहे का याचा तपास सुरु असल्याचे निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर त्याचा योग्य वापर होतोय का यावर पालकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.तसेच पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देताना पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे, विशेषकरून लहान मुलांसह मुलींना देखील चांगल्या वाईट गोष्टीची समज दिली तर असे प्रकार कमी होण्यास मदत होऊ शकते.
0 Comments