-->

Ads

पतीचा मृत्यू, रुग्णालयातून घरी येताच पत्नी-मुलानेही विष घेतलं, पुण्यातील घटनेने सारेच हादरले

Pune Mother Son Suicide: पुण्यात एका महिलेने आपल्या मुलासह मिळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.


 पुणे: पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुरसुंगी भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून घरी परतलेली पत्नी आणि मुलाने पुन्हा विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२६ जून) उघडकीस आली.

संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण दोघे वाचले

जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (वय ६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) अशी आत्महत्या केलेल्या महिला आणि मुलाची नावे आहेत. २२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी), त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पत्नी आणि मुलाला वाचवण्यात यश आलं होतं. उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना रुग्णालातून घरी सोडण्यात आले होते.

विषारी औषध घेत पत्नी आणि मुलाची पुन्हा आत्महत्या

पण, घरी येताच या दोघांनी सोमवारी विषारी औषध पिऊन पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चेतन याचा घटस्फोट झाला होता. तो नोकरीही करत नव्हता. कौटुंबिक समस्या, तसेच आजारपणामुळे या कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा संशय आहे.




Post a Comment

0 Comments