अटक केलेल्या तरुणावर खून, खुनाचा प्रयत्न असे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
मन्या उर्फ बसवराज यादव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आषाढी एकादशी, बकरी ईदनिमित्त कल्याण शहराच्या विविध भागात गुरुवारी पोलीस गस्त घालत होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे हे कल्याण पूर्व भागात आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना साकेत महाविद्यालय परिसरात एक तरुण हातात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.
बोचरे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मन्या यादव साकेत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या जवळ पिस्तूल आढळून आले. सखोल माहिती काढल्यावर तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. मन्याने पिस्तूल कोठून आणले आणि तो साकेत परिसरात काय करणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
0 Comments