Badlapur News Today : बदलापूरमध्ये दोन भावांचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंबड्याच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता क्षणात असं काही घडलं की दोघांचा एकत्रच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
बदलापूर : बदलापूरच्या ग्रामीण भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वांगणीजवळील ढवळे गाव परिसरात राहणाऱ्या दोघा चुलत भावांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झालआहे. तर त्यांचा तिसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडलाअसून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
कुमार याच्या वडिलांनी ढवळे गावात फार्म हाऊस चालवायला घेतले असून फार्म हाऊसचे देखरेखीचे आणि साफसफाई काम चालू असताना जयेश हा फॉर्म हाऊसमधील कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासासाठी गेला. मात्र, त्या दरवाजात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कुमारलाही विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
0 Comments