-->

Ads

शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात

 आधी मैत्री आणि नंतर प्रेम :  मुलींवर वारंवार अत्याचार करत असल्याने घाबरलेल्या शाळकरी मुलींनी सर्व हकीकत आई-वडिलाला सांगितली.त्यानंतर आई-वडिलांनी वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाविरोधात तक्रार दिली असता गुन्हे दाखल करण्यात आलाय


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर पुसद : पुसद येथील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीस वर्षाच्या नराधमाने दोन वर्षांपासून अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमा विरोधात वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये दि.२३ जून २०२३ ३७६, (२) एफएम, पोक्सो ,६,१० नुसार गुन्हा दाखल  करण्यात आले आहे.अटक केलेल्या आरोपीला पुसद न्यायालयामध्ये हजर केले असता दि.२७ जून २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आदित्य वाठोरे वय ३० वर्षे रा.पुसद असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्यने येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधली. अशातच दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.त्यानंतर आदित्यने तिच्यासोबत दोन वर्षांपासून अत्याचार करणे सुरू केले.तो त्या शाळकरी मुलींवर वारंवार अत्याचार करत असल्याने घाबरलेल्या शाळकरी मुलींनी सर्व हकीकत आई-वडिलाला सांगितली.त्यानंतर आई-वडिलांनी वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाविरोधात तक्रार दिली असता गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल होताच दि.२३ जून २०२३ रोजी आरोपीला अटक देखील केले आहे.अटक केलेल्या आरोपीला तीन दिवसाचा पीसीआर मिळाला आहे.



















Post a Comment

0 Comments