Sanjay Raut News: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे
माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत यांना फोन केला. या फोनवरून संजय राऊत यांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. दोन राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
0 Comments