-->

Ads

दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन, विद्यार्थिनीनं शाळेच्या पहिल्याच दिवशी उचललं टोकाचं पाऊल..

 सांगरुळ : पाचकटेवाडी (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीने बाथरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रुती मारुती सुतार (वय १५) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली.


श्रुती सुतार ही बोलोली येथील स्वयंभू हायस्कूलमध्येदरम्यान, काल शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेला जाण्याची तयारी करत होती. श्रुती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. बराच वेळ ती बाहेर न आल्याने वडिलांनी बाहेरुन हाक मारली असता तिने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी दरवाजा तोडून बाथरूममध्ये प्रवेश केला.

शिक्षण घेत होती. ती दहावीच्या वर्गात जाणार होती. तिने सुरुवातीपासूनच दहावीच्या अभ्यासाचे टेन्शन घेतले होते. तिच्या वडिलांनी तिला अभ्यासाचे टेन्शन घेऊ नको असे वारंवार सांगितले होते. त्यावेळी तिने साडीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले तिला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments