-->

Ads

रिल्स बनवण्यासाठी विहिरीवर गेला अन् तोल जाऊन पडला, ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर...

 रिल्स बनवण्याच्या नादात पडला एक १८ वर्षांचा मुलगा विहरीत पडल्याची घटना घडली आहे. ठाकुर्ली परिसरातील ही घटना आहे.

 तरुण पिढी सोशल मीडियाच्या पूर्णपणे आहारी गेली आहे. सेल्फी काढण्याच्या मोहापायी अनेकांनी जीव गमावले आहेत. तर, सोशल मीडियावर स्टार (Reels Star) होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी धडपडत असतात.  रिल्स शूट करण्यासाठी धोकादायक स्टंट करणे किंवा पवित्र ठिकाणी आक्षेपार्ह व्हिडिओ काढणे, असे प्रकार हल्ली वाढले आहेत. यातील अनेकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. तरीदेखील रिल्ससाठी धोका पत्करणाऱ्या तरुणांचे डोळे अजून उघडलेले नाहीत. डोंबिवलीतही (Dombivali) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. रिल्सच्या (Instagram Reels) नादात एका तरुणाने जीव गमावला आहे.

मुंब्र्याचा तरुण रिल्ससाठी डोंबिवलीत गेला  


डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागातील पंप हाउसच्या खोल विहीरीत पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिलाल सोहिल शेख असे या तरुणाने नाव आहे. बिलालच्या मृत्यूनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

रिल्स बनवताना तोल गेला 


पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. विहिरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम ३२ तास सुरू होते. सोमवारी सांयकाळी अग्निशमन दलाच्या जवानांना बिलालचा मृतदेह हाती लागला. दरम्यान बिलाल हा रिल्स बनवत असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगीतले. तसंच, तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. 



Post a Comment

0 Comments