छत्रपती संभाजीनगर: राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिडको पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असताना त्यांना एक मुलगी रडताना दिसली. रडत बसलेल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. जन्मदात्या वडिलांनीच मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे ऐकून मुलीला धीर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरवळल्याचे पहायला मिळाले. दरम्यान या प्रकरणी सिडको पोलिसांनामध्ये वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको पोलीस अंतर्गत हद्दीमध्ये राहणारी १४ वर्षीय वर्षा (नाव काल्पनिक आहे) बारा महिन्यांपूर्वी वडिलांच्या जागी साफसफाई कामगार म्हणून नोकरी लागली होते. वर्षाला एक लहान बहिण असून आई गर्भवती होती. वर्षा लहानपणापासून उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र यादरम्यान तिच्यावर दोन वर्षांपासून वडिलांनी अत्याचार सुरू केला. दरम्यान हा संपूर्ण प्रकार वर्षानी आईला सांगितला. मात्र भीतीपोटी आईने वडिलांच्या या कृत्यावर पांघरून घातलं.
वडील सातत्याने अत्याचार करत होते. मात्र चौदाव्या वर्षात असलेल्या वर्षाला ते समजत नव्हतं. नंतर तीने याला विरोध करायचा ठरवलं. याचा राग मनात धरून वडिलांनी वर्षाला बेदम मारहाण करायचे. दोन दिवसांपूर्वी वर्षा घरी एकटीच असताना वडील घरी होते. यावेळी वडिलांनी तिच्यावर नजर टाकली. त्यांनी थेट बळजबरी करण्याचा प्रयत्नही केला. घाबरलेल्या वर्षाने ही बाब आईला सांगितली. मात्र गर्भवती आईने पुन्हा तिला शांत केले. वारंवार होणाऱ्या घटनेमुळे वर्षा संतापली होती. तिचा संयम सुटला.
दरम्यान तिने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलीस ठाणे गाठण्याचे ठरवलं. विचारपूस करत ती सिडको पोलिसांपर्यंत पोहोचली. मात्र ठाण्यात जाण्यापूर्वीच ती काही अंतरावर थांबली. दोन-तीन तास ती त्या ठिकाणी रडत होती. यावेळी सिडको पोलिसांतील महिला कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असताना त्यांची नजर वर्षावर पडली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी तिला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले. १४ वर्षी वर्षाला पोलिसांमध्ये आणल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वायदंडे यांनी तिला विश्वासात घेतले.
यावेळी वर्षाने रडायला सुरुवात केली.
महिला कर्मचाऱ्यांनी तिला विश्वासात घेत धीर दिला. तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. १४ वर्षे चिमुकली तिच्यावर ओढावलेला प्रसंग सांगत असताना धीर देणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा डोळ्यात अश्रू तरवळले. दरम्यान घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी तात्काळ वर्षाच्या आई व इतर नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले. यावेळी घडलेल्या घटनेप्रकरणी तक्रारी संबंधात विचारपूस केली असता आई ठाण्यातही पतिविरोधात तक्रार देण्यास इच्छुक नव्हती.
मात्र साक्षी तिच्यावर घडलेल्या अतिप्रसंगामुळे तक्रार देण्यास ठाम राहत होती. यावेळी तिच्या तक्रारीवरून तात्काळ बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्ष वायदंडे यांनी वडिलांना अटक केली. यातील आरोपीला न्यायालयाने १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्यातील आरोपीने २०१५ मध्ये देखील परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सहा महिने कारागृहाची सजा भोगली होती. मात्र यातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतल्याने तो बाहेर आला होता.
0 Comments