-->

Ads

दुर्घटना:मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळ्याजवळ भीषण अपघात; ट्रकची 2 पिकअप व्हॅनला धडक, 1 ठार, 2 जखमी

 मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 1 जण ठार, तर 2 जण जखमी झाले. ही घटना खेडला घाट परिसरात आज पहाटे घडली. मृत व जखमींची नावे अजून कळली नाही.


यासंबंधीच्या माहितीनुसार, लोणावळ्याहून मुंबईकडे एक ट्रक भरधाव जात होता. अंडा पॉइंटच्या एका कठीण वळणावर या ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने 2 पिकअप व्हॅनला धडक मारली. ट्रकचा वेग इतका होता की, या वाहनांना धडकल्यानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या अपघातात पिकअप व्हॅनचा चालक व्हॅनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमीत एका शाळकरी मुलाचा समावेश आहे.

महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर व खराब झालेले वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम केले जात आहे.


वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले

प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. अंडा पॉईंट येथे चालकाचे उतार व वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने 2 पिकअप व्हॅनला धडक दिली. दुर्दैवाने एक पिकअप ट्रक कंटेनरच्या खाली अडकला. पिकअप चालकाला वेळीच बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलिस, खोपोली पोलिस व आयआरबीसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या खंडाळा परिसरात क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे आणि कंटेनरच्या खाली असलेले पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



नुकताच झाला होता टँकरचा अपघात

काही दिवसांपूर्वीच खंडाळा घाटाजवळ केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरचा अपघात झाला होता. त्यानंतर टँकरने पेट घेतला होता. केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे टँकर स्लिप होऊन रस्त्यावर उलटला. परिणामी, त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. यामुळे काही तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत पुलाखालील गाड्यांनाही आग लागली होती.


मागील काही दिवसांपासून पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याची विविध कारणे आहेत. या मार्गावर अनेक चढ-उतार आहेत. त्यामुळे अनेकदा भरधाव मोठ्या वाहनांचा ताबा सुटतो. कायम वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर अनेकदा वाहने एकमेकांना धडकतात. त्यामुळे अनेकांचा जीव जातो. गाड्यांचेही नुकसान होते. अनेक ठिकाणी फलक व बॅरिगेटींग करण्यात आली नाही. यामुळेही वाहन चालकांना योग्य दिशा समजण्यास अडचण होते.







































































Uploading: 252264 of 252264 bytes uploaded.

Uploading: 252264 of 252264 bytes uploaded.

Uploading: 252264 of 252264 bytes uploaded.


















Post a Comment

0 Comments