शहरातील सतोड शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात ४६ वर्षीय प्रौढाचा निर्घृण खून करून फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आली होती.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने ७२ तासांत खुनाच्या घटनेचा उलगडा केला असून, दोन संशयितांनी रवींद्र मधुकर पाटील (वय ४६) याचा १५ हजार रुपयांसाठी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील सतोड शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात ४६ वर्षीय प्रौढाचा निर्घृण खून करून फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आली होती. सुरवातीला अनोळखी असलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत हा चिनावल (ता. रावेर) येथील रवींद्र मधुकर पाटील (वय ४६) असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे स्वतंत्र पथक रवाना केले व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेत होतो.
दरम्यान, पोलिसांना गुरुवारी (ता. ८) दुपारी अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील अज्ञात मयतास ४ जूनला मुक्ताईनगर शहरातील संशयित राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांच्यासोबत एकत्र पाहिल्याची माहिती मिळाली. त्यावरून राहुल काकडे व योगेश काकडे यांची माहिती घेतली असता ते गावात आढळून आले नाही.
शुक्रवारी (ता. ९) पोलिस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी संशयित राहुल काकडे व योगेश काकडे यांचा शोध घेत असताना ते आढळून आल्याने त्यांना पोलिस ठाण्यात आणले व विश्वासात घेऊन विचारपूस केली असता रवींद्र पाटील यांच्याकडे १५ हजार रुपये रोख असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मुक्ताईनगर ते बोदवड जाणाऱ्या रस्त्याने एक किलोमीटर अंतरावर नेऊन त्याच्याजवळील पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून त्यास दगडाने जबर मारहाण करून ठार केले.
या गुन्ह्यातील संशयित राहुल संतोष काकडे (वय २५, रा. रेणुकानगर, मुक्ताईनगर), योगेश गजानन काकडे (वय १९, रा. जुनेगाव, जुनी उर्दू शाळेजवळ, मुक्ताईनगर) यांना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, उपविभागीय अधिकारी कुळकर्णी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) किसन नजनपाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलिस उपनिरीक्षक संदीप चेढे,
पोलिस कर्मचारी शैलेश चव्हाण, संतोष नागरे, कांतिलाल केदारे, नितीन चौधरी, देवसिंग तायडे, धर्मेंद्र ठाकूर, विजय पठार, संजय पवार, संदीप खंडारे, विनोद सोनवणे, सुरेश पाटील, रवींद्र मेढे, रवींद्र धनगर, मुकेश महाजन, अमोल जाधव, अंकुश बाविस्कर, विजय कचरे, सचिन जाधव, प्रशांत चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील आदींनी तपासात सहभाग घेतला
0 Comments