-->

Ads

तो 12 वर्षाचा, ती 7 वर्षाची, त्याने जे केले ते त्याची कुणी कल्पनाही केली नसेल

 Pune Cirme News : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे समाजातील प्रत्येक जण अस्वस्थ झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने हा प्रकार केला असल्यामुळे समाजातून चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे चिंता निर्माण झाली आहे. जे वय खेळण्याचे असते, टीनएजर्स अजून मुलगा झालेला नाही, त्या वयात त्याने जो प्रकार केला, त्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळूच घसरली. मोबाइल अन् टीव्हीने मुलांना काय दिले? हे यामुळे पुढे आले आहे. आपण पाश्चत्य जगाकडे वाटचाल तर करत नाही ना? अशी भीती निर्माण झाली आहे. खरंतर अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसवण्यासाठी पालकांनी घरातूनच संस्कार निर्माण केले पाहिजे. ही जबाबदारी फक्त शाळांवर सोपवून पालकांचे काम होणार नाही, तर मुलांना घरातूनच धडे दिले पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले

पुणे जिल्ह्यात एका बारा वर्षीय मुलाने चक्क सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. त्या १२ वर्षीय मुलाने शाळेच्या बाथरुममध्ये सात वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्या मुलीने ही घटना घरी आपल्या पालकांना सांगितली अन् त्यांना हादराच बसला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.


Post a Comment

0 Comments