सायबर क्राइम पोलिसांच्या नावाने एस्कॉर्ट सेवा (सुरक्षितता) देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलाला तब्बल 1 लाख 18 हजार रुपयांचा गंडा घातला गेला.
पोलिस उपायुक्त निकिता खट्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकुलातील एका अल्पवयीन मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याला एस्कॉर्ट सेवा देण्याच्या बहाण्याने त्याच्या खात्यातून 1 लाख 18 हजार रुपये काढले गेले. त्यानंतर पंचकुला सायबर क्राइम पथकाने या प्रकरणाचा तपास करून या टोळीचा पर्दाफाश झाला. सर्व आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून यादरम्यान त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे.
ही टोळी राजस्थानमधून कार्यरत होती. या भामट्यांनी सुमारे 100 लोकांना लुटलं. एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली फसवणूक करण्याचे काम गेल्या एका वर्षापासून सुरू होतं. त्यांचे सदस्य वेबसाईटच्या माध्यमातून आपलं नाव आणि नंबर जाहीर करायचे, ज्यावर लोक एस्कॉर्ट सेवेसाठी संपर्क करायचे. त्यानंतर या टोळीतील लोक एस्कॉर्ट सेवा आणि हॉटेल बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळायचे.
0 Comments