Dogs Care : कुत्र्याला घरात सोडून बाहेरगावी कसं जायचं? असा प्रश्न अनेकांना सतावतो. तुमची ही चिंता दुर करणाऱ्या मुंबईतील एका खास जागेची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
चांदिवली फार्म रोड पवई येथे ' पेट फेलिक्स' हे डॉग हॉस्टेल सध्या प्राणीप्रेमींमध्ये फेमस आहे. तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही तुमच्या कुत्र्यांना इथं ठेवू शकता. पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या संरक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी पार पाडणं हा 'डॉग हॉस्टेल'चा हेतू आहे. त्यांची तिकडे योग्यप्रकारे देखभाल केली जाते. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते त्यांच्या आरोग्याबद्दल ऐकूणच सर्वच काळजी घेतली जाते.
पेट फेलिक्स हे मुंबईतील सर्वात मोठ डॉग हॉस्टेल आहे. सर्वमित ओबेरॉय हे चांदिवली येथे गेल्या पाच वर्षांपासून डॉग हॉस्टेल चालवत आहेत. 'सुरुवातीच्या काळात ही संकल्पना फार पाहायला मिळत नव्हती. मित्र मंडळी, नातेवाईक, लोकं यांना लग्न कार्य सुट्टी याठिकाणी जायचं असल्यास अडचण निर्माण होत होती. घरातील कुत्र्याला कुठे ठेवायचं. याचा विचार करून आम्ही जगातील सर्वात चांगल हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि याची सुरुवात झाली.
पेट फेलिक्स हे हॉस्टेल 6400 स्क्वेअर फिट मध्ये असून याठिकाणी 50स्क्वेअर फिटची प्रत्येक कुत्र्याला स्वतंत्र एसी खोली मिळते. या 40 खोल्या याठिकाणी आहेत. त्याचबरोर मनोरंजनासाठी, खेळण्यासाठी, फिरण्यासाठी वेगळी जागा आहे. तसेच प्रत्येक कुत्र्याला त्याच्या सोयीनुसार जेवण दिलं जातं. तसंच त्यांचा स्वतंत्र व्यायाम करुन घेतला जातो.
कशी घेतात काळजी?
पेट फेलिक्स डॉग हॉस्टेलचे संस्थापक सर्वमित ओबेरॉय सांगतात की, 'सुट्टीच्या काळात अनेकजण फिरण्यासाठी बाहेरगाी जातात. त्यावेळी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याची गैरसोय होते. त्यांना कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं? असा त्यांना प्रश्न सतावत असे. ही काळजी दूर करण्यासाठी आम्ही पाच वर्षांपूर्वी डॉग हॉस्टेल सुरू करण्याचं ठरवलं. या होस्टेलमध्ये विविध जातींच्या कुत्र्यांची काळजी घेतली जाते. त्यांचं राहणं, खाणं, खेळणं या सर्व गोष्टी या ठिकाणी नियमित करून घेतल्या जातात.
या कुत्र्यांना एक दिवस मोफत या हॉस्टेलमध्ये ठेवलं जातं. त्या काळात त्याचं निरिक्षण करून त्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळतो. आपण एखाद्या हॉटेलमध्ये 24 तासांसाठी किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी रूम बुक करतो त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यांसाठी देखील रुम बुक केली जाते. या हॉस्टेलमध्ये चेकिंग आणि चेक आऊट वेळेनुसार शुल्क आकारले जाते. 24 तासांसाठी 1300 रुपये शुल्क आहे. यामध्ये राहणं, जेवण व्यायाम आणि इतर अॅक्टिव्हिटीजही आहेत. त्याचबरोबर घरापासून ते हॉस्टेलपर्यंत आणण्यासाठी पिकप आणि ड्रॉप देखील उपलब्ध आहे, अशी माहिती ऑबेरॉय यांनी दिली.
0 Comments