-->

Ads

Maharashtra Weather Update : पावसाबाबत हवामान खात्याची मोठी माहिती , राज्यातील 9 जिल्ह्याना सर्तकतेचा इशारा

 

राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस होणर असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे.






    पुणे, 12  एप्रिल : महाराष्ट्रात सध्या बऱ्याच जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस होणर असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे. राज्यातील 9 जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मागचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात गारपिटीने तडाखा दिला आहे.

    दरम्यान राज्यातील 9 जिल्ह्यात पुढच्या 24 तासांत वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. 13) मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


    वादळी पावसामुळे हवामान दमट होत असल्याने उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. राज्यातील मागच्या 24 तासांत सोलापूर येथे उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथे तापमान 39 अंशावर होते. परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे पारा 38 अंशांच्या पार गेला आहे. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 34 ते 37 अंशांच्या दरम्यान होते.

    मान्सूनचा प्रभाव कसा असेल


    प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या अल निनो व ला नीना या दोन प्रक्रियाचा भारतीय मान्सून वर प्रभाव होतो. ला नीना पावसासाठी चांगली तर अल नीनो पावसासाठी नकरात्मक आहे असे गृहीतक आहे. मात्र सध्या या दोन्ही परिस्थिती प्रशांत महासागरात नाहीत. ती परिस्थिती तटस्थ (नुट्रल) आहे.

    मात्र भारतात जुलैमध्ये अल निनो सक्रिय होत आहे. त्यामुळे पाऊस कमी पडेल असे काही लोक भाकीत करीत आहेत. असे असले तरी भारतीय समुद्री स्थिरांक व युरेशियन बर्फाळ प्रदेशातील आच्छादनाचा परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. या दोन्ही परिस्थिती सकारात्मक आहेत त्यामुळे जुलै नंतर पाऊस चांगला पडू शकेल.



    ला नीनो चा मान्सूनशी संबंध 40 टक्केच…

    आतापर्यंत 15 वेळा ला नीनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. ला नीनोचा मान्सूनशी 40% संबध गृहीत धरला जातो. त्यामुळे जुलै नंतर पाऊस कमी पडेल हा फक्त अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. पण आयओडी (भारतीय समुद्री स्थिरांक) व युरेशिया तील बर्फाच्छादन ही परिस्थिती भारतीय मान्सून ला सकारात्मक आहे.

    Post a Comment

    0 Comments