-->

Ads

मेट्रोत कपलला राहिलं नाही भान, Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल

 

दररोज अनेक लोक मेट्रोने प्रवास करत असतात. मेट्रोमधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.




    नवी दिल्ली, 5 एप्रिल : दररोज अनेक लोक मेट्रोने प्रवास करत असतात. मेट्रोमधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या तरुणीच्या चर्चा अजूनही संपल्या नव्हत्या की, आता चालत्या मेट्रोमध्ये एका जोडप्याच्या किसिंग व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओचीच चर्चा रंगली आहे.

    ट्विटरवर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये एका जोडप्याचे कृत्य पाहून मेट्रोमध्ये प्रवास करणारे इतर प्रवासी लाजून इकडे तिकडे पाहू लागले. याशिवाय या व्हिडीओवर संतापही व्यक्त केला जात आहे.


    दिल्ली मेट्रोतील कपलचा किसिंग व्हिडीओ @RealVirendraBJP नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अगदी काही सेकंदांची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कपल मेट्रोमध्ये एकमेकांना मिठी मारुन रोमान्स करत आहे. हळूहळू ते एकमेकांनी किसही करतात. सार्वजनिक ठिकाणी केलेलं हे कृत्य सध्या इंटरनेटवर व्हायरल होतंय. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहेत.


    दरम्यान, अशा प्रकारांमुळे इतर प्रवाशांचीही गैरसोय होत असून त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर संतप्त सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर एखादा मुलगा किंवा मुलगी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असेल तर त्यांना तुरुंगात जावे लागू शकते. आयपीसीच्या कलम 294 अन्वये पोलीस जोडप्याविरुद्ध कारवाई करू शकतात. हा व्हिडीओ व्हायरल होताच चांगलीच खळबळ उडाली. आता याप्रकरणी पोलीस काय पाऊल उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Post a Comment

    0 Comments